FREE ACTING WORKSHOP – मोफत अभिनय कार्यशाळा

मोफत अभिनय कार्यशाळेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० जून २०१८    

अभिनय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांकरीता मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन.

व्हिक्ट्री व्हिजन संस्थेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी संस्था गेली ८ वर्षांपासून सतत कार्यरत आहे. बालकलाकारांना, तरुण कलाकारांना तसेच अभिनयाची आवड असणाऱ्या प्रौढ कलाकारांना देखील या संस्थेच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ मिळत आहे. या अनुषंगाने व्हिक्ट्री व्हिजन संस्थेच्या माध्यमातून मोफत कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 1 जुलै २०१८ पासून सुरू होत आहे. यामध्ये विविध सत्रांत अनुभवी मान्यवर कलाकारांकडून वेगवेगळया विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. पाच सत्रांच्या या कार्यशाळेत सत्राअखेरीस कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा १ जुलै २०१८ ते २९ जुलै २०१८ रोजी दुपारी ३.३० ते संध्या. ७ वाजेपर्यंत घेतली जाईल. यामध्ये आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग, आवाज जोपासना, व्यक्तिमत्व विकास, नाट्य वाचन, एकसंघपणा, रंगभूमीबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

सदरच्या कार्यशाळेत सहभागी होण्याकरीता ९८२१३७५७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.